नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२७.११.१९
येवला- राजापूर गण अनुसूचित जाती स्त्री राखीव मतदार संघातून निवडून आलेल्या लक्ष्मीबाई गरुड यांची बिनविरोध उपसभापती पदी निवड झाली. भाऊसाहेब गरुड आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते यांच्या मातोश्री असून येवला तालुक्यातील न्यारखेडे गावातील सर्व सामान्य कुटुंबातील महिला आज उपसभापती पदी निवड झल्यामुळे सर्व स्तरातून तालुकाभर कौतुक होत आहे.
निवडीच्या वेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, गटविकास अधिकारी श्री.वारुळे यांच्यासह माजी आमदार मारुतीराव पवार, पंचायत समिती सभापती कविता आठशेरे सह सर्व पंचायत समिती सदस्य, माजी उपसभापती रुपचंद भागवत, संजय पगारे, महेंद्र पगारे, जितेश पगारे, भाऊसाहेब अहिरे, झुंजरराव देशमुख, भास्करराव कोंढरे, रतन बोरणारे, छगन आहेर, संतोष मढवई, कांतीलाल साळवे, विठ्ठलराव आठशेरे आदींसह शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















