नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कैलास गायकवाड
दि.२५.१०.१९
येवला- स्थानिक नेते विरुद्ध छगन भुजबळ अशी रंगलेली येथील निवडणूक या वेळी चमत्कार ठरवेल असा तर्क निकालानंतर साफ खोटा ठरला आहे. निवडणुकीत भरलेला रंग आणि नेत्यांनी लावलेली फेंल्डींग असे असले तरी मतदारांनी भुजबळांना साथ देऊन त्यांना प्रचंड मतांचं मताधिक्य मिळवून दिलं आहे.
येवल्यात यावेळी भुजबळ यांना हटवून स्थानिक भूमिपुत्र ना संधी द्या असे आव्हान स्थानिक विरोधकांनी केले होते.
विशेष म्हणजे शिवसेना प्रमुखांनी भुजबळ यांच्या विरोधात सभा घेतली होती त्यावेळी त्यांनी येवल्याला आलेले हे पार्सल परत पाठवून द्या असा टोला ही भुजबळ यांना लगावला होता मात्र भुजबळांची रणनीती आणि सूक्ष्म अभ्यास आणि विकास कामे यांच्या जोरावर त्यांना मतदारांनी कौल दिला आहे. यावेळी दराडे, पवार, शिंदे हे स्थानिक नेते जरी एकत्र आले असले तरी बनकर कुटुंब मात्र त्याच्या सोबत होते. बनकर यांच्या सह त्यांचे पुत्र संजय बनकर, पुतणे नगरसेवक प्रवीण बनकर यांनी स्वतःची निवडणूक समजून काम केल्याने भुजबळ यांच्या विजयात त्यांचा वाटा मोलाचा आहे.
• येवला लासलगाव मतदार संघात उमेदवाराना मिळालेली मते
छगन भुजबळ मते १,२६,२३७विजयी, संभाजी पवार सेना ६९,७२२, सचिन अलगट १८५४, एकनाथ गायकवाड ६३५,महेंद्र पगारे ७१३,विजय सानप२८७,संजय पवार ३२६.



















