पिंपरी चिंचवड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.६.५.१९
पिंपरी,रमजान पूर्वी तयारीला सर्वत्र वेग आला असून संपूर्ण महिनाभराचे नियोजन आत्ताच करण्यात आले आहे. या महिन्याचे स्वागत करण्यासाठी बालक महिला पुरूष वृद्ध . मुस्लिम धर्मगुरू सर्व सारेजण सरसावले असून उपवास कधी सुरू होतो. याची सर्वत्र मोठ्या आतुरतेने वाट पहात आहेत मुस्लिम धर्मात पवित्र समजाणारे जाणारा रमजान महिना दि. ७ ला येऊन ठेपला आहे चंद्रदर्शन झाल्यास दि. ६ मे रोजी नमाज-ए-तरावीहला सायंकाळी सुरवात करण्यात येणार आहे तर दि.७ मे पासुन रोजास प्रारंभ होणार आहे.याबाबतची सर्व ती घोषणा धर्मगुरू करतील.



















