औरंगाबाद (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी: विजेंद्र गायकवाड पुणे.
दि. २/१०/२०१८
औरंगाबाद येथिल जाबिंदा मैदान येथे वंचित बहुजन आघाडीचे शेतकरी अधिवेशन पार पाडले. अधिवेशन ठरलेल्या वेळेनुसार सकाळी ११.००वाजता चालू झाले. ह्या अधिवेशनात अनेकविध समाजाचे प्रतिनिधींने वंचित बहुजन आघाडीला सार्वजनिक रित्या पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. ह्यामध्ये अमितभाऊ भुईंगूळ (भारिप), मा. अरुण घोडके (साळी समाज), महेश मिनाने (शांती समिती अध्यक्ष), रविकांत राठोड (बंजारा समाज, राष्ट्रिय बंजारा परिषद), ह.भ.प. अर्जुन महाराज पांचाळ (सुतार समाज), एस.एस. विराडे (कोळी समाज), गणपत भिसे (कॉम्रेड मातंग समाज), पी.एस.चव्हाण (वडार समाज), जमोनिया मोहम्मद (नगरसेविका औरंगाबाद ), गफर कादरी (MIM) , इम्तियाज जलिल (MIM), अक्खतर इमाम (MIM), संध्याताई वाघमोडे (कुणबी समाज), रेखाताई ठाकूर (भारिप), विजय मोरे (माजी आमदार), लक्ष्मण माने, इत्यादी मान्यवर शेतकरी अधिवेशनात बोलत होते.
महाराष्ट्रातील शोषित, वंचित आणि पिढित समाजाने एकत्रित येऊन बाळासाहेबांना साथ देण्याची हाक एम.आय.एम चे खासदार असदुद्दीन ओवेसी ह्यांनी सभेमध्ये बोलताना उपस्थित लाखोंच्या जनसमुदायास दिली. “सनातनवर कारवाई कधी होणार …राजेशाही लोकशाहीत चालणार नाही” असे मत भारिप बहुजन महासंचाचे अध्यक्ष मा.आमदार ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी व्यक्त केले तसेच सर्व समाजाने एकत्रित येऊन सत्ता कायापालट करण्याचा निर्धार ह्यावेळी करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी नियोजित शेतकरी अधिवेशनचे संपुर्ण नियोजन औरंगाबाद भारिप सचिव प्रदेशाध्यक्ष अमितभाऊ भुईगुळ ह्यांनी पार पाडले.



















