पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०९.१९
◆ अपना वतन राज्यभर करणार संघटनेचा विस्तार
पिंपरी-अपना वतन संघटनेच्या वतीने रविवार दि.२९सप्टेंबर१९ रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.संघटनेचे माजी अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेले नवनिर्वाचित अध्यक्ष हरिशचंद्र तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये खालील मुद्द्यांवर चर्चा व निर्णय झाले.
◆ अपना वतन संघटनेचा विस्तार राज्यभर करण्याच्या दृष्टिकोनातून संघटनवाढीसाठी सभासद फी व प्रवेश फी निशचित करून सभासद नोंदणी सुरु करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
◆ शीतलबाग प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून करण्यात आलेला खुलासा संघटनेने अमान्य केला असून या प्रकरणात राज्यसरकार व पालिका प्रशासन भ्रष्ट नेते व अधिकाऱ्यांना वाचवत असल्याने राज्यसरकार व पालिका प्रशासन चा निषेध करण्यात आला व पुढील नियोजन ठरविण्यात आले.
◆ पोलिसांकडून आंदोलकर्त्यावर लावण्यात येणारे कलम ३७ व ३५३ बाबत प्रबोधन व कायदेशीर आंदोलन उभे करण्याबाबत चर्चा विमर्श करण्यात आला.
◆ संघटनेकडे प्राप्त झालेल्या तक्रारींवर संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यासाठी अंतर्गत कमिटी स्थपन करण्यात आली.
◆ पिंपरी चिंचवड पालिकेतील भ्रष्टाचारच्या प्रकरणाबाबत उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष हरिशचंद्र तोडकर यांनी सांगितले कि स्थानिक मुद्द्यांवर काम करीत असतानाच आज अनेक राज्यस्तरीय प्रश्न जनतेला भेडसावत आहेत. त्यासाठी केवळ पुणे जिल्ह्यात काम करून चालणार नाही त्यासाठी राज्यभरातून सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या संघटनेला राज्यातील सर्व जिल्हयातून आपले संघटना उभे करून स्थनिक प्रश्नांवर त्या त्या भागात काम सुरु केले पाहिजे.या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष हरिशचंद्र तोडकर,संस्थापक सदस्य सिद्दीकभाई शेख,सचिव दिलीप गायकवाड,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर,शहर उपाध्यक्ष संतोष शिंदे,भोसरी विभाग प्रमुख अस्लम शेख,तौफिक शेख ,हमीद शेख,हाजीमलंग शेख,अकील सय्यद,विशाल बोत्रे,बाळू अडागळे यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



















