पिपरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१२.०१.२०२०
पिंपरी- राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांच्या आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबीराचे आयोजन संभाजी ब्रिगेड व रेड स्वस्तीक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने त्रीवेणी हॉस्पिटल वाल्हेकरवाडी चिंचवड येथे करण्यात आले या भव्य मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन माननीय महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी आपले विचार मांडताना समाजातील प्रत्येक महिलेने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉसाहेबांचे आदर्श व जिवन चरीत्र डोळ्यासमोर ठेवून जिवन जगले पाहिजे तसेच स्वामी विवेकानंदांचे विचारच भारताला महासत्ता बनविण्यासाठी पुरक ठरतील असे विचार मांडले या प्रसंगी नगरसेवक अभिषेक बारणे, नगरसेवक सुरेश भोईर, नगरसेविका करुणा चिंचवडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे,PCMC चे माजी सहआयुक्त अमृतराव सावंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश समन्वयक शांताराम कुंजीर, जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, शहर अध्यक्ष सुधीर पुंडे, संपर्क प्रमुख नकुल भोईर,छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, राजेंद्र देवकर, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार, प्रदेश संघटक मंगेश शिगवण, शेतकरी कामगार पक्षाचे हरीश मोरे, भालचंद्र फुगे, दुर्गामृत दुध संघाचे चेअरमन हणुमंत चव्हाण,जल संवर्धन समितीचे अध्यक्ष मुजफ्फर इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश सचिव विशाल जाधव, बहुजन वंचित आघाडीचे शहर अध्यक्ष गुलाब पानपाटिल, मुंबई माजी नगरसेविका जनाबाई जाधव, यांची उपस्थिती होती.
या भव्य मोफत आरोग्य शिबीरास प्रसुतीशास्त्र तज्ञ डॉ मोहन पवार, डॉ अश्वीनी पवार ग्लोबल आय इंस्टीटुट च्या डॉ देवयानी पाटील, स्त्रीरोग तज्ञ संजय पोंधे, शल्य चिकित्सक डॉ भरत ओझा, वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ प्रितम सुलाखे, बालरोग तज्ञ डॉ प्राजक्ता भोकरे, नेत्ररोग तज्ञ डॉ आशिष कांबळे, डॉ राजहंस भोकरे, डॉ अभिजित शिंदे, छाती व उरोरोग तज्ञ डॉ अभिजित सांयबंर, यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आली या आरोग्य शिबीरामध्ये एकुण ५७० शिबिरार्थीनी लाभ घेतला या प्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली व संभाजी ब्रिगेड च्या भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराबद्दल सामाजिक जाणिवेतून केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.तसेच शिबिरार्थींना सेवा व सुश्राषा प्रदान करण्यार्या डॉक्टर आणि सहकारी कर्मचारी वृंदाना संभाजी ब्रिगेडतर्फे आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्ञानदेव लोभे,रशीद सय्यद, अमोल धोडसरे, मंगेश चव्हाण, परशुराम रोडे यांनी अथक परिश्रम घेतले व शिबीराचे आयोजन सतिश काळे परमेश्वर जाधव यांनी केले



















