बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अमोल साखरे
दि.२७.०७.१९
बीड- चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याच्या अवघ्या काही तासांतच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्पूर्वी, शुक्रवारी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. येत्या काही दिवसांत त्या भाजपमध्ये प्रवेश दुसरीकडे, रूपाली चाकणकर या पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा होत्या. संघटनेतील अनुभव लक्षात घेऊन त्यांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. रूपाली चाकणकर यांच्यावर राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पक्ष बदलाचे वारे वाहत असताना संघटना मजबूत करण्यावर त्यांना भर द्यावा लागणार आहे. दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने इच्छुकांच्या मुलाखतींना सुरवात केली, परंतु काही विद्यमान आमदारांनी मुलाखतीला अनुपस्थिती दर्शवल्याने राष्ट्रवादीपुढे मोठा पेच उभा राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.



















