नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०१.२०२०
येवला- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अंतर्गत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला तसेच गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालय येवला यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव ता.येवला येथे १ जानेवारी ते ७ जानेवारी २०२० या सप्ताहात रा.से.यो.निवासी शिबीर उत्साहात पार पडले.या शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी मा.राजेंद्र पाटील यांच्या हस्ते पार पडले.गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.अमृत सा पहिलवान अध्यक्षस्थानी होते. यावेळी येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती संगीता नांदूरकर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता, स्पर्धा परीक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. येवल्याचे तहसीलदार श्री.रोहिदास वारुळे, कापसे पैठणी उद्दोग समूहाचे श्री.बाळासाहेब कापसे, उधोगपती श्री.सुशीलशेठ गुजराती, येवला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भाऊसाहेब गमे, मुक्तानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.बी.गोस्वामी,सरपंच सौ.मिराताई कापसे, उपसरपंच सौ.हर्षदा पगारे, ग्रामसेवक गणेश रोकडे आदी उपस्थित होते. रा.से.यो.विभागाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सात दिवसाच्या या शिबिरात ग्रामस्वच्छता, वृक्षलागवड, सामाजिक जनजागृती, वृक्षारोपण, ग्राम सर्वेक्षण, प्लॅस्टिकमुक्त पर्यावरण, आदी महत्वाच्या विषयांवर विद्यार्थी स्वयंसेवकांनी काम केले. कापसे पैठणी उद्दोग समूह येथे भेटीदरम्यान सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन चाचणी करण्यात आली. विविध मार्गदर्शनपर व्याखान याठिकाणी पार पडले.उच्च शिक्षण व्यवस्था या विषयावर प्रा.डॉ.जी.डी. खरात, दिव्यांगासमोरील समस्या या विषयावर प्रा.अर्जुन कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. मुलींचे कुपोषण या विषयावर डॉ.सुरेश कांबळे यांनी संवाद साधला. कुपोषण ही समस्या फक्त शारीरिक नसून तिचे स्वरूप हे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक बनत चालले असल्याचे त्यांनी सांगितले. सर्पमित्र निखिल पाटील यांनी विविध प्रकारच्या सर्प जाती, येथे आढळणाऱ्या बिनविषारी, विषारी सर्पाची माहिती विद्यार्थ्यांना देत ‘सर्पना’ मारू नये आढळल्यास सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.काव्य प्रतिभेचे लेणे या विषयावर कवी श्री.लक्ष्मण बारहाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात ह.भ.प.अनिल महाराज जमधडे यांनीही स्वयंसेवकांशी संवाद साधला. दि.७जानेवारी २०२० रोजी या रा.से.यो. शिबिराचा समारोप समारंभ पार पडला. यावेळी कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष निकम अध्यक्षस्थानी होते.यावेळी सुशीलशेठ गुजराती, प्राचार्य डॉ भाऊसाहेब गमे, सरपंच मिराताई कापसे,उपसरपंच हर्षदा पगारे, रा.से.यो.कार्यक्रम आधिकारी प्रा.आर.एन. वाकळे,प्रा.डॉ.अजय विभांडीक, प्रा.एस. पी.देवरे, प्रा.पी.एन.पाटील, श्रीमती प्रा.एस. सी.पांडे, प्रा.डॉ.मनीषा गायकवाड, प्रा.डॉ.राहणे, प्रा.टी. एस. सांगळे आदी उपस्थित होते. स्वतःसाठी जगत असतानाच देशहिताच्या कामासाठी सदैव तत्पर असलेला युवक रा.से.यो.ला अभिप्रेत असल्याचे डॉ.निकम यांनी सांगितले. महापुरुषांचा वारसा जपणे आपले आद्य कर्तव्य असून महाविद्यालयिन जीवनात आपल्या समृद्ध व्यक्तिमत्वाला आकार मिळत असतो, जिद्द व चिकाटी असेल तर युवकांकरिता काहीही अशक्य नाही, आजच्या तंत्र युगात हरवत चाललेले विचार व संवाद आपल्याला पुन्हा सुरू करणे गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. समर्थ भारतासाठी सक्षम युवक घडविण्यासाठी आम्ही विविध पातळीवर प्रयत्न करत असल्याचे प्राचार्य.डॉ.गमे यांनी सांगितले. सामाजिक व समृद्ध राष्ट्रनिर्मितीच्या कामांसाठी आपले सदैव सहकार्य राहील असे सरपंच मिराताई कापसे यांनी सांगितले. यावेळी स्वामी मुक्तानंद महाविद्यालयाची विद्यार्थीनी शुभांगी साताळकर यांनी ‘आधुनिक सावित्री’ही नाटिका सादर करून महिलांविषयी, शैक्षणिक, सामाजिक, जनजागृतीचा संदेश दिला. यावेळी रा.से.यो.प्रतिनिधी महेश दारुटें, सागर घोडेराव, वैष्णवी भागवत, अंकिता दिवटे, यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन धनगे यांनी केले. प्रा.एस. पी.देवरे यांनी आभार मानले.



















