सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.३०.०९.१९
फलटण- लोणंद रेल्वे स्टेशन पासून जवळ सईबाई हाऊसिंग सोसायटीच्या गेट समोर सौ.लता विश्वनाथ शेडगे रा. लोणंद जाधव आळी(वय ६०वर्ष)ही महिला फाटक बंद असताना रेल्वे रुळ ओलांडून जात होती.दरम्यान रेल्वे गाडी आल्याने महिलेला रेल्वेची धडक बसली.यातच तिचा जागीच मृत्यू झाला.प्रा.आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला.याप्रकरणी अधिक तपास रेल्वे लोंणद पोलीस करीत आहेत.



















