• २६/११ तील शहिदाना श्रद्धांजली ..
नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी शांताराम दुनबळे
दि.२६.११.१९
नाशिक- लासलगाव शहरात “संविधान दिन” मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम भास्करराव शेजवळ यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर नानासाहेब बनसोडे यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे पुजन करण्यात आले.
त्यानंतर सर्व उपस्थितानी सामुहीक संविधान उद्देशिकेचे वाचन करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकराना मानवंदना दिली.
डॉ अमोल शेजवळ यानी भारतीय संविधान दिनाचे थोडक्यात महत्व विषद केले. डॉ.आंबेडकरानी २ वर्षे ११ महिने १७ दिवस अथक परिश्रम करुन हि भारतीय राज्यघटना तयार करुन देशाला अर्पण केली स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय ही घटनेची ४ मुख्य स्तंभ असल्याचे त्यानी आपल्या भाषणात सांगितले.
भा.बौ.महासभेचे कोषाध्यक्ष राजेंद्र शेजवळ, जेष्ठ केंद्रीय शिक्षक दौलतराव गायकवाड यानी नी आपले मनोगत व्यक्त करुन २६ / ११ च्या हल्ल्यात शहीद जवानाना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली सदर कार्यक्रमाप्रसंगी सनि पाठक, सागर आहिरे, सोनु शेजवळ, उमेश शेजवळ, मनोज शेजवळ, अकिल शेख, नाना सुर्यवंशी, मनोहर आहिरे, कैलास निळे, तसेच महिलावर्गात भारती शेजवळ, सुशिला शेजवळ, छाया शेजवळ, मनिषा शेजवळ, पुष्पा गायकवाड, रेखा गायकवाड, माया केदारे, शैलाताइ आहिरे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भा बौ महासभेचे बौद्धाचार्य प्रकाश संसारे यानी केले तर
सौ.भारतीताई शेजवळ यानी उपस्थितांचे आभार मानले.



















