पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.०३.०६.१९
पिंपरी- लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेश सचिव धुराजी शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी पिंपरीतील डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. वाढदिवसाच्या दिवशी बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचणार अशी शपथ घेण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आली.संध्याकाळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना महाराष्ट्र शासन अध्यक्ष नितीन घोलप,मातंग एकता आंदोलन पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष दत्तु चव्हाण,रासप पक्षाचे वाहतुक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष पोपट आरणे,मारूंजी गावचे उपसरपंच संदिप जाधव,महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस अल्पसंख्याक विभाग चे उपाध्यक्ष राजन नायर,मातंग एकता आंदोलन युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विशाल कसबे,अजय चव्हाण,राजकुमार चव्हाण,दिनकर ओव्हाळ,अरूण मैराळे,नवनाथ धोत्रे,दत्ता गोडसे,कांचन जावळे,गिरीश सोनवणे,सुभाष विद्यानगर ,हरीभाऊ गायकवाड,अनिल मकरे,राहुल प्रधान,दिलीप कांबळे,कांतीलाल शिंदे,आकाश शिंदे,राजू आवळे,नवनाथ शेलार,स्वप्निल शेंडगे आदी उपस्थित होते.



















