उस्मानाबाद(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, अभय गायकवाड
दि.१.१२.१९
उस्मानाबाद- लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलच्या पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी शैक्षणीक सहलिनिमित्त दिनांक ३० नोव्हेंबर १९ रोजी सहल करुन ऐतिहासीक नळदुर्ग येथील किल्ल्याला भेट दिली. यावेळी बोरी धरण, अणदूर येथील प्रसिद्ध श्री.खंडोबा मंदिर या सहलीत सहभागी चिमुकल्यांना १००ते १५० एकरमध्ये पसरलेला, ७५ बुरुज, पाण्याचे तुषार उडवत प्रेक्षकांना आनंद देणारा नरमादी धबधबा, अनेक तलाव, मजबूत व भव्य लाकडी प्रवेशद्वार, आश्चर्यचकित करणारे पाणी महाल, घोड्याचा पागा, तोफा, भक्कम तटबंदी निसर्गरम्य बगीचा, अशा अनेक गुढ रहस्यांनी बनवलेला अनेक वर्षांपासून आपली ओळख व इतिहास जपलेला विशाल किल्ला, पाहून चिमुकले भारावून गेलीं. त्याच्या विचारा पलीकडचा असा किल्ला व परिसर पाहुन सर्व चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सहलीमध्ये चिमुकल्यानी व शिक्षकांनीही श्रीराम मठाचा निसर्गरम्य परिसरात वनभोजनाचा आस्वादही घेतला. सहल यशस्वी करण्यासाठी स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सिद्धेश्वर सुरवसे, गणेश सूर्यवंशी, महिला शिक्षिका, अदिंनी, परिश्रम घेतले.



















