चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.२४.०९.१९
चिमूर- विधानसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये चिमूर विधानसभा करीता वंचित बहुजन समाजा कडून अधिकृत उमेदवार म्हणून मा.अरविंदभाऊ सांदेकर यांच्या नावांचा अधिकृत घोषणा करण्यात आली आहे अरविंदभाऊच्या अधिकृत उमेदवारांनी विरोधकांची चांगली दमछाकक होणार असून या उमेदवारांची पहिली यादी आज मा.प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिध्द केली आहे.पहिल्या यादी मधे अरविंदभाऊ संदेकार उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.वंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांची युती तुटल्यानंतर अखेर एमआयएम ने दोन याद्यांमधून सात उमेदवार घोषित केले तर वंचित बहुजन आघाडीने पहिल्याच यादीत २२ जागांवर वंचित उमेदवारांची नावे जातीनिहाय जाहीर केले आहे. आज प्रकाश आंबेडकर यांनी अखेर वंचितची पहिली यादी जाहीर केली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्रासाठी अरविंदभाऊ यांच्या नावाने शिक्कामोर्तब झालेला आहे. अरविंदभाऊ सांदेकर यासह २२ मतदारसंघातून उमेदवारची पहिली यादी जाहीर केले आहे.



















