सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभास जाधव
दि.४.१०.१९
सातारा – २५५ फलटण,कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून वंचितचे अरविंद आढाव यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या जल्लोषात भरण्यात आला. अर्ज भरण्यापूर्वी दुपारी १.३०वाजता फलटण शहरातून नाना पाटील चौक ते तहसील कार्यालया पर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते फलटण तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मा.बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्याचे आव्हान करत अर्ज भरला यावेळी सुभाष गायकवाड भारिप जिल्हा उपाध्यक्ष,वैभव शंकर पवार,युवा नेते बहुजन वंचित आघाडी,जीवन पवार सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



















