पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१/१/१९
शिक्रापूर(वढू), नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभास लाखो भिम अनुयायांनी मानवंदना दिली याच भिमअनुयायांनी पुढे संभाजी महाराज यांचे समाधीस व गोविंद गोपाळ यांचे समाधीस अभिवादन केले.यावेळी गर्दीने उच्चांकाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
वढू येथील गोविंद गोपाळ यांचे समाधीस बुध्दीस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने फुलांची सजावट करण्यात आली होती.गर्दीचे नियोजन करण्यासाठी बुध्दीस्ट प्रेरणा ग्रुपचे स्वयंसेवक दोन दिवसांपासून वढू येथील गोविंद गोपाळ यांचे समाधी स्थळावर सेवा पुरवत होते.यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे,पांडुरंग गायकवाड,संदीप गायकवाड,सुमित गायकवाड,विकास ओव्हाळ,शिलरत्न दिपंकर,नंदकुमार जोगदंड,प्रमोद जोगदंड,कुणाल जगताप,केतन जगताप,अशोक बल्लाळ यांचेसह मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.
गोविंद गोपाळ यांचे समाधीस अनेक पक्ष संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.दि.३१ तारखेपासूनच वढू येथील समाधीस भिमअनुयायी भेट देत होते.राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी देखील संभाजी महाराज व गोविंद गोपाळ यांचे समाधीस भेट दिली तसेच बौद्ध वस्तीस भेट देऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली.
यावेळी गर्दीने सर्व उच्चांक मोडले आहेत.वाहतुकीचे पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन केले होते तरीही अफाट गर्दीमुळे विजय स्तंभाकडे जाण्यास उशीर होत होता.विजय स्तंभास भेट देऊन वढुच्या दिशेने गाडीने येण्यास प्रवेशबंदी होती.वढू फाट्या पर्यंत चालत येऊन पुढे बसेस ची व्यवस्था करण्यात आली होती.परंतु याची भिमअनुयायांना फारशी माहिती नव्हती या ठिकाणी तशा कोणत्याही सूचना अथवा माहिती दर्शविणारे फलक नव्हते त्यामुळे इच्छाअसूनही अनेक भिमअनुयायी वढू पर्यंत पोहोचू शकले नाहीत.अशी तक्रार अनेक भिम अनुयायी करत होते.



















