पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.१०.१९
पुरंदर-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी बारामती येथील गुन्हे शोध पथकाने वाल्हे दूर क्षेत्राच्या मदतीने वाल्हे पुरंदर येथील लक्ष्मी ढाब्यावर संयुक्त कारवाई करून यात रोख रकमेसह १०६ दारूच्या बाटल्या ३५ लिटर गावठी दारू असा एकूण सहा हजार ६५६ रुपये किमतीचा अवैद्य दारू साठा जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली यावेळी वाल्हे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक राजेंद्र भापकर म्हणाले बारामती येथील गुन्हेशोध पथकाच्या मधली रात्री लक्ष्मी या ढाब्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली यावेळी कोणी शोध पथकातील सुरेंद्र वाघ दशरथ कोळेकर संदीप जाधव विशाल जावळे आदी सहभागी झाले होते.



















