सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.४.०१०.१९
सातारा- फलटण,कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार मा.दिपक चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दि.४ऑक्टोबर रोजी हजारो च्या संख्येने निघालेल्या रँली मधे यावेळी तरुणांची संख्या लक्षणीय होती.जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मार्केट कमिटीचे चेअरमन श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर , जिल्हा बॕकेचे नवनिर्वाचित संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर,पंचायत समितीचे सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर,महानंदाचे उपाध्यक्ष मा.डी.के.पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते मा.सुभाषराव शिंदे,मा.बाळासाहेब सोळस्कर , मा.दिलीपसिंह भोसले, नगराध्यक्षा सौ.निताताई नेवसे, सभापती प्रतिभाताई धुमाळ, यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीराम मंदिरात श्रीफल वाढवून मुधोजी मनमोहन राजवाडा पासून निघालेली रँली शहरातील प्रमुख रस्याने जावून सेंट्रल बिल्डिंग जवळ दाखल झाली.



















