पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.०७.०६.१९
पिंपरी- पिं.चिं. महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या साने चौकातील संपर्क कार्यालयाची शुक्रवारी तोडफोड झाली. अज्ञातांनी ही तोडफोड केल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या बाबत दत्ता साने यांनी सांगितले, शुक्रवारी दुपारी तीन वाजतापर्यंत मी कार्यालयात होतो. कामानिमित्त बाहेर गेलो. त्यानंतर काही अज्ञातांनी वाहनांतून येऊन तोडफोड केली. यातील पाच ते सहा जण कार्यालयाबाहेर थांबले होते. तीन जणांनी कार्यालयात येऊन काचांची तोडफोड केली. या वेळी कार्यालयात दोन कामगार मुली होत्या. या मुलींच्या अंगावरही या काचा पडल्या. त्यामुळे त्या प्रचंड घाबरल्या आहेत. तोडफोड करून अज्ञातांनी पळ काढला. याबाबत माहिती मिळताच मी घटनास्थळी आलो.दरम्यान तोडफोड झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे नागरिकांनी कार्यालयाबाहेर गर्दी केली. तोडफोड केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. तोडफोड करणारे अनोळखी होते.पुढील तपास सुरू आहे.



















