पिपंरी (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१०.०१.२०२०
झोपडपट्टी धारकांना५०० फुटाचे घर देण्यात यावे मागासवर्गीयांचे उद्योग कर्ज माफ करण्यात यावे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली असून त्या अनुसंघाने पिंपरी चिंचवड शहर रिपाई पक्षाच्या वतिने पिंपरी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे शांततेत निदर्शने आंदोलन करण्यात आले.
सत्तेवर येण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र केवळ ०२ लाखाची शेतकर्यांना कर्ज माफी देवून शेतकर्यांच्या डोळ्यात धुळफेक केल्याचा अरोप करत. शेतकर्यांचे सर्व कर्ज माफ करुन शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे (दि.१० जानेवारी) राज्यभर निदर्शने करण्यात आली. मागासवर्गीय तरुणांना उद्योगासाठी दिलेले कर्ज माफ करावी त्यासाठी राज्यातील विविध महामंडळातर्फे मागासवर्गीय तरुणांना दिलेल्या कर्जाची अंदाजे १३ कोटींची कर्ज माफी शासनाने द्यावी. संत रोहिदास चर्मोेद्योग विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती विकास महामंडळ, शबरी आदिवासी विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, खादी आणि ग्रामोद्योग विकास महामंडळ, अपंग विकास महामंडळ, ओबीसी इतर मागासवर्गीय विकास महामंडळ या महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे. या आंदोलनांचे नेतृत्व पिंपरी चिंचवड रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (आठवले) शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी केले. आंदोलनात प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य महिला सचिव मा.नगरसेविका चंद्रकांताताई सोनकांबळे,महाराष्ट्र राज्य सचिव बाळासाहेब भागवत, महाराष्ट्र वाहतुक प्रदेशाध्यक्ष अजिजभाई शेख, खाजाभाई शेख, पिं.चिं. युवक अध्यक्ष प्रणव ओव्हाळ, पिं.चिं. नेते बाळासाहेब रोकडे, कुणाल वाव्हळकर, दशरथ ठाणांबीर, इत्यादी उपस्थित होते. व अशोक गायकवाड अप्पा भोसले, मनोज जगताप, यशवंत सुर्यवंशी, हरी नायर, प्रमोद वाघमैतर, अक्षय दुनघाव, बापु वाघमारे यांनी आंदोलन यशस्वी केले



















