पिंपरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१९.११.१९
आकुर्डी- वेलफेयर पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मान्यवर सलीम शेख यांच्या हस्ते संपर्क कार्यालय आकुर्डी येथे कार्यकारणी सदस्यानां पद वाटपाचे पत्रक देण्यात आले. यामध्ये पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष म्हणून सालार उमरसाब शेख, पिंपरी चिंचवड शहर रिक्षा संघटना अध्यक्ष म्हणून अब्दुल रशीद मोहंमद, पिंपरी चिंचवड विधानसभा अध्यक्ष फिरोज लाला साहेब तांबोळी, लायकअली नवाब शेख यांची भोसरी विधानसभा सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली. माननीय सलीम शेख यांनी सर्व कार्यकर्त्यांना सदर पदाचे पत्रक देऊन त्यांचा सन्मान करत पक्ष वाढीसाठी शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले. यावेळी पुणे जिल्हा प्रमुख जावेद सौदागर, मलंग गडवाल, दशरथ गंगणे, उस्मान शेख, सलीम शेख व इतर सामाजिक कार्यकर्ते आदी सदस्य उपस्थित होते.



















