चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)विकास खोब्रागडे
दि.२३.९.१९
चिमूर- शंकरपूर येथील दै. सकाळ चे वार्ताहर युवराज मुरस्कर यांना गावातील नितीन सावरकर,नरेश वनकर,गणेश वनकर यांनी तू आमच्या विरोधात बोलून बदनामी करतोस उलट बातम्या लिहितोस म्हणून मारहाण सुरु केली व आगाऊ करशील तर तुला येथेच जिवंत मारून टाकतो अशी धमकी दिली
युवराज मुरस्कर नेहमी प्रमाणे जेवण झाल्यावर बस स्टाप समोरील पान ठेल्यावर मित्रा सोबत नुकत्याच जाहीर झालेल्या आचार साहितेवरून राजकीय चर्चा करत असतांना तेव्हा अचानक गावातील नितीन सावरकर,नरेश वनकर,गणेश वनकर हे त्या ठिकाणी येऊन तू आमच्या विरोधात बोलून बदनामी करतोस उलट बातम्या लिहितोस म्हणून मारहाण सुरु केली व आगाऊ करशील तर तुला येथेच जिवंत मारून टाकतो धमकी दिली.या संदर्भात पोलीस स्टेशन भिसी यथे तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी वर ५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पूवी एका वर्षा आधी नवभारत चे पत्रकार जगदीश पेदाम यांना सुद्धा बातम्या छापण्यावरून येतील ग्रामपंचाय सदस्या च्या पतीने जगदीश पेदामच्या दुकानात जाऊन शिवी गाळी करून जीवे मारण्याची धमकी दिली होती गावातील गुंड प्रवीतीचे लोकांनी येथील पत्रकारांना वारंवार कुठल्या ना कुठल्या विषयावरून धमकावत असतात सदर घटनेचा नावातील नागरिकांनी निषेध केला असून अशा गुड प्रवृत्तीच्या लोकावर कारवाही करण्याची मागणी पत्रकार संघटनेसह जनतेकडुन होत आहे.



















