पिंपरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.१८.११.१९
पिंपरी- शगुन चौक येथील वाहनतळाच्या जागेवरील हातगाडी पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले असल्याचे सांगत हे अतिक्रमण महानगरपालिका प्रशासन विभागाने हटवावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी महानगर पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, ट्रॅफिक जाम होत असल्याचे नमूद केले आहे व लवकरात लवकर अतिक्रमण हटवून जागा पार्किंगसाठी खुली करावी व अतिक्रमण करणार्यांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडवे लागेल असा इशारा पालिका प्रशासनाला सुंदर कांबळे यांनी दिला आहे.



















