बारामती(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.१०.१९
बारामती- दिवाळीच्या मुहुर्तावर मुंबई युवक काँग्रेसनं शरद पवारांना दोन किलो चांदीची गदा भेट दिली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात पैलवान नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी प्रचारादरम्यान म्हटलं होतं, मात्र निवडणुकीत पवारांनी तगडी लढत दिली. पवारांनी मुख्यमंत्र्यांना चितपट केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळं युवा कार्यकर्त्यांनी पवारांना चक्क गदा भेट दिली.



















