• काही ठिकाणी मशिनमधे बिघाड.
• तरूणाईचा लक्षणीय सहभाग.
चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.१०.१९
चंद्रपूर- चिमूर विधानसभा क्षेत्रात शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली असून मतदान केंद्रावर काही मतदान केंद्रावर अद्यापही मतदान प्रक्रिया सुरू आहे. सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत ७२.२० टक्के मतदान झालं असून यात वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणच्या मतदान केंद्रावर गर्दी असल्याने अद्यापही अंतिम आकडेवारी स्पष्ट झाली नाही.
तालुक्यातील अमरपुरी(भांसुली) व कन्हाळगाव येथे ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने तब्बल दीड तास उशिरा मतदान प्रक्रिया सुरू झाली तर तळोधी(नाईक) येथे बिघाड निर्माण झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया बंद होती. या वर्षी प्रशासनाने मतदान केंद्राच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती.
निवणूक विभागाने सर्व स्तरावर केलेल्या जनजागृती मुळे मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या वर्षी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदान केंद्रावर सायंकाळी सुमारास मजुरवर्गाने गर्दी केल्याने अद्यापही काही ठिकानी मतदान सुरू असून आहे.



















