पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२७.०७.१९
काळेवाडी- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना काळेवाडी, रहाटणी विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. शिवसेना शहरसंघटक हरेश आबा नखाते व सदस्या-जाणीव फाऊंडेशन पिं.चिं.शहर सौ. सुजाताताई हरेश नखाते यांनी आयोजन केले. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथील ऑक्सिकेअर मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल व ओम बल्ड बॅक व डाॅ. शेखर घाडगे, डाॅ.प्रथम सांळुके यांच्या सहकार्याने आश्विनी कॉलनी, पार्वती स्कुल रस्ता येथे शनिवारी (दि.२७ शनिवार) सकाळी ९ वाजेपासुन शिबिराची सुरूवात करण्यात आली व दुपारी ३ वाजेपर्यत सुमारे शेकडो जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये रक्त, लघवी, शुगर आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.गजानन चिंचवडे, शहरसंघटिका सौ.अॅड. उर्मिलाताई काळभोर, एकनाथ मंजाळ, बाळासाहेब काळे, बाळासाहेब शिरसाट, संजय गायके, अर्जुन कांबळे, शंकर जाधव, लक्ष्मण टोणपे, नरसिंग माने दिलीप सुर्यवंशी लक्ष्मण सुर्यवंशी, राजु शिंदे, महंद्र गिरासे ,नेताजी नखाते, आदिक भोसले, सिताराम राणे, रुस्तुम वायभट, सुधा नाईक, शारदा वाघमोडे, मुक्ता पवार, मिना वराट, चंद्रीका सांळुके, वंदना वायभट, सविता जाधव, वैशाली राऊत, आदि उपस्थित होते. या कार्यकम्रासाठी मातोश्री सामाजिक संस्था अध्यक्ष गणेश आहेर, विभागप्रमुख गोरख पाटील, प्रदीपदादा दळवी, विभागसंघटक गणेशभाऊ वायभट, पै.अंकुशभाऊ कोळेकर, अनिल पालांडे, बाळासाहेब येडे, प्रजाक नढे, योगेश वायभट, आकाश शिरोळे, स्वत्निल कुंभार, भागवत वायभट, दादा घोडके, यांनी परिक्षम घेऊन शिबीर यशस्वी केले.



















