सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, गोविंद मोरे
फलटण तालुक्यातील तहसील,प्रांत कार्यालयाच्या आवारामध्ये मोकाट जणावरे व तेथे असलेल्या मुतारी व्यवस्था देखील कोडमडलेली आहे येणार्या महीला व पुरूषांना त्रास खुप सोसावा लागत आहे तसेच
भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांची अडवणूक करत आहेत. या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या व कर्मचारी मनमानी व भ्रष्ट कारभाराला कंटाळून या कार्यालयास कामकाजात सुधारणा न झाल्यास व तहसील,प्रांत ,कार्यालयाच्या आवारा बाहेरील स्वच्छेते बाबत दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी फलटण तालुका उपप्रमुख प्रदीप झणझणे ,सुभाष जाधव उपप्रमुख, हेमंत सुतार,गणेश गायकवाड युवासेना उपप्रमुख, जितेंद्र नाळे या शिवसैनिक यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला.
याबाबत तालुका उप अधिक्षक भूमी अभिलेख शिल्पा जवक यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील,पालकमंत्री शिवतारे, यांना पाठवण्यात आल्या आहेत.



















