चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
चिमूर, ताक्यातील पिपरडा (पळसगांव) मध्ये दिनांक२२/११/२०१८ ला श्री प्रक्षुब्ध बहुउदेशीय संस्था पिपरडा ता.चिमूर च्या वतीने आभाळाची माया प्रस्तुत आयु,सुलभाताई खोब्रागडे (लार्ड बुद्धा टी व्ही फेम)यांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम रात्रौ ८ वाजता बुद्ध विहाराच्या पटांगणात साजरा करण्यात आला.महाकारूनिक तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना त्रिवार अभिवादन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. मा.मुरकुटे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी पळसगळ व यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी आपल्या मनोगत वेक्त करताना संविधानाचा प्रचार,प्रसार आणि संरक्षण करणे तसेच संविधानाने दिलेल्या अधिकारांची सर्वांना जाणीव करून देणे अशाच समाजप्रबोधना च्या कार्यकमातून समाजप्रबोधन घेण्यात यावे. अध्यक्षस्थानी वर्षा लोणारकर मॅडम,चुनारकर सर,गेडाम साहेब,आमावार साहेब,सातपुते साहेब,रूपंचंद बारसागडे,शिवदास गजभिये,हसदास कळाम,उत्तम ढोक,प्रमोद मेश्राम,प्रक्षुब्द संस्थातेच्या अध्यक्षा मंदाबाई चुनारकर, उपअध्यक्षा हिराबाई चुनारकर,आकाश ढोक कोषाअध्यक्ष, यांच्या उपस्थती मध्ये बहुजन समाजाच्या जनसमुदाय च्या संख्येत प्रस्तुत आभाळाची माया,सुलभाताई खोब्रागडे व कमलेश भोयर यांच्या समधूर सुरांनी साजरा करण्यात आला.
भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला ६९ वर्षे होत असून. देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली.
संविधान दिन साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलेला असला,शासकीय पातळीवर हा संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय कार्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करावी, हेच या समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमातून सूर उमटले.



















