चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.२८.०७.१९
तुकुम- कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय (खत्री कॉलेज) तुकुम चंद्रपुर जवळ असलेल्या SVA कार्यालय या ठिकाणी सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा चंद्रपुर ची बैठक उत्कृष्ट रित्या पार पाडली. या बैठकीचे आयोजन आशीष बोरेवार यानी केले. जिल्हा अध्यक्ष धीरज तेलंग यांच्या अध्यक्षते खाली बैठक घेण्यात आली. बैठकीची सुरुवात सिद्धार्थ शेंडे यांनी सूत्र संचालन करन केली. या मध्ये विद्यार्थांनी पूर्ण सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला विद्यार्थांनी आपल्या समस्या जिल्हा अध्यक्षा समोर मांडल्या आणि अध्यक्षानी विद्यार्थांच्या प्रत्येक प्रश्नांश उत्तर समाधानकारक देऊन विद्यार्थांच्या मनामध्ये उत्साह भरला चर्चे मध्ये खलील विषयावर विशेष भर दिला.
◆ वर्तमान सरकार शिक्षण विषयक धोरण
◆ वर्तमान सरकार विद्यार्थांन कशा प्रकारे अन्याय करत आहे
◆ विद्यार्थांच्या शालेय जीवनातील सर्वांगीण प्रश्न
◆ होऊ घातलेल्या महाविद्यालयीन निवडणुका
◆ विद्यार्थांच्या बेरोजगारीचा प्रश्न
अश्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली
या नंतर विद्यार्थांनी अध्यक्षाचे शब्दसुमणाने स्वागत केले
आणि सर्व विद्यार्थी सम्यक विद्यार्थांनी आंदोलन मधे सहभागी होऊ अशी ग्वाही दिली
या चर्चा सत्रा मध्ये जास्तीत जास्त विध्यार्थी सहभागी झाले होते.



















