सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.४.१०.१९
फलटण- एका सराफ व्यावसायिकाची फसवणूक करून पश्चिम बंगालमध्ये फरारी झालेल्या आरोपीस फलटण शहर पोलिसांनी अटक करून १४ लाख ३० हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नितीन गांधी यांच्या शांतीकाका सराफ या दुकानात संशयित आरोपी कारागीर अशोककुमार नारायण मंडल(वय ४५) रा किशोरपूर ता. ढेबरा जि.पश्चिम मंदिनापूर राज्य पश्चिम बंगाल हा सोन्याचे दागिने बनवून देण्याचे काम करत होता. त्या आरोपीने गांधी यांचा विश्वास संपादन करून सोन्याचे दागिने बनवून देतो असे सांगून १६ लाख ९६ हजार रुपये किंमतीचे सोने नेले.परंतू ते परत न देता गांधी यांचा विश्वासघात व फसवणूक करून हा आरोपी पळून गेला होता.या गुन्ह्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती पोलिस उपनिरीक्षक डी.ए.दळवी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित आरोपी हा पश्चिम बंगाल मधील किशोरपूर तालुका डेबरा जिल्हा पश्चिम मदिनापूरमध्ये असल्याचे समजताच त्या भागात जाऊन त्याची चौकशी केली.हा भाग नक्षली व दलदलीचा असतानाही स्थानिक पोलिसांच्या मदतीने कौशल्यपूर्ण तपास करीत आरोपी मंडल यास पोलिसांनी अटक करून त्याच्याकडील १४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व आरोपीला अटक केली आहे.



















