सोलापूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१९.११.१९
माळशिरस- सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाचे आरक्षण हे एस.सी.सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्यामूळे एस.सी.प्रवर्ग महिला व पुरुष दोन्ही उमेदवार जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणुक लढवू शकतात. त्यामुळे नातेपुते जिल्हा परिषद गटामधुन सौ.साक्षी महेश सोरटे या भाजपा कडुन एकमेवच एस.सी.प्रवर्गातून निवडुन आलेल्या जिल्हा परिषद सदस्या भाजप कडे आहेत. ते यामूळे त्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या भाजपा कडुन उमेदवार असतील हे निश्चित मानले जाते. सोलापूर जिल्हा परिषद मध्ये एस.सी प्रवर्गातून महिला उमेदार शिला शिवशरण-मंगळवेडा (अपक्ष),सांगिता धांडोरे-सांगोला (शेकाप),स्वाती कांबळे-सांगोला (शेकाप),रेखा गायकवाड- दक्षिण सोलापुर (कांग्रेस), साक्षी सोरटे- माळशिरस (भाजप)
• पुरुष उमेदार
बाळासाहेब धांईजे-माळशिरस (राष्टवादी),
अतुल खरात-पंढरपुर (राष्टवादी), शिवाजी सोनवणे सर-मोहोळ (राष्टवादी), अनिरुध्द कांबळे-करमाळा (शिवसेना), अॅड संजय गायकवाड- दक्षिण सोलापुर (कांग्रेस), निवडून आलेले उमेदवार आहेत. परंतु सौ.साक्षी महेश सोरटे हे भाजप कडून अध्यक्ष पदाची निवडणूक लढवतील अशी महिती सूत्राकडून मिळली आहे.



















