विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ जयंती निमित्त दि.२६/०४/१८ रोजी निर्भिड पत्रकार या वृत्तपत्राचे सातारा जिल्हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी निर्भिड पत्रकार उपसंपादक गोंविद मोरे, फलटण तालुका ग्रामीण पोलिस PSI भोसले साहेब व पोलिस सहकारी, सातारा जिल्हा बसपा सचिव मंगेश मोरे, फलटण तालुका भरिप अध्यक्ष किरण मोरे, विनोद मोरे, पुणे पोलिस सुनिल मोरे, मुंबई पोलिस मनोज मोरे, पोलिस पाटील सरडे लखन बनसोडे, जयभिम मित्र मंडळ अध्यक्ष विशाल मोरे, जयभिम मित्र मंडळ माजी अध्यक्ष रामभाऊ शेंडगे, संदीप मोरे, महेश मोरे, राहुल मोरे, दत्तु मोरे, गणेश साळवे, धनंजय आटोळे, सुधीर शेंडगे यांच्या उपस्थितित उत्साहात पार पडला. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बुद्ध, शाहू, फुले, शिवराय, आंबेडकर चळवळीचा परिवर्तन वादी प्रबोधनात्मक क्रांतिकारी गीतांचा जल्लोष महाराष्ट्राचे प्रख्यात गायक भिमशाहीर अशोक निकाळजे व संच मुंबई यांचा कार्यक्रम सरडे बंगला येथे सादर करण्यात आला.



















