पिंपरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२.१२.१९
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या १५०० महिला आहेत या महिलांना गेल्या अनेक दिवसापासून कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही त्यांना आरोग्यविमा अशा कुठल्या सुविधा दिल्या जात नाही तसेच त्यांना समान वेतन किमान वेतन हे देखील दिले जात नाही. गेल्या तीन महिन्यापासून त्यांना पगार देखील देण्यात आलेले नाही. या सर्व प्रश्नांवर आज कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकावरती मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात आले कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांची नेते बाबा कांबळे ,यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला यावेळी पंचायत कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, कार्यध्यक्ष बळीराम काकडे, दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी BRSP,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सर्वजीत बनसोडे, शहराध्यक्ष संजीवन कांबळे, महेंद्र सरोदे, रविकिरण बनसोडे, राम बनसोडे, यांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला, आणि मार्गदर्शन केले.
समान काम समान वेतन मिळाले पाहिजे ! मिळायलाच पाहिजे कायमस्वरूपी कामावर घेतलं पाहिजे महापालिकेच्या योजनेमध्ये हक्काचे घरकुल मिळालेच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. कष्टकरी महिलाच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली मोर्चा महानगरपालिकेच्या गेटवर आल्यानंतर पोलिसांकडून अडवण्यात आला या ठिकाणी भाषण करण्यात आले यावेळी बाबा कांबळे सर्वजीत बनसोडे संजीवन कांबळे प्रल्हाद कांबळे, यांनी मार्गदर्शन केल, यावेळी बाबा कांबळे म्हणाले पिंपरी-चिंचवड शहरात पंधराशे महिला कंत्राटी पद्धतीने साफसफाई कामे करत आहेत या महिलांना किमान समान वेतन आणि कामगार कायद्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत तसेच गेल्या अनेक महिन्यापासून पगार देखील दिला जात नाही याच बरोबर या महिलांनी त्यांचे पासबुक त्यांचे एटीएम कार्ड ठेकेदाराने स्वतःकडे ठेवली असून तेथे त्यांचा दुरुपयोग करून त्यांचा पगार काढला जात आहे. याबद्दल महापालिका अधिकाऱ्यांना कळऊन देखील यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही यामुळे संबंधित अधिकारी आणि सत्ताधारी पक्षातील काही मंडळी या घटनेला सहकार्य करत असून यांच्या संगनमताने हा सर्व प्रकार सुरू आहे. गेले अनेक दिवस कष्टकरी कामगार पंचायत या प्रश्नांवर लढा देत असून पुढील काळात जर का प्रश्न सुटला नाही तर हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय यावेळी बाबा कांबळे यांनी जाहीर केला.



















