सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.१४.१०.१९
फलटण- विधान सभा २०१९ होणाऱ्या निवडणुकीत पोलिसांना बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना,सोमेश्वरचे सदस्य पोलीस दलाला मदत करणार आहेत. पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील यानी राज्यात एकाच वेळी २१ ऑक्टोबरला मतदान होणार असुन अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीसाना निवडणुकीत खुप धावपळ करावी लागणार आहे. त्यामुळे सैन्यदलातील अधिकारी पोलीस व एन एस सी ई ची मदत घेण्याची गरज असुन तशी विनंती संघटनाना करणेत यावी असे पोलिस अधिकारी वर्गाला सुचवले होते. त्यानुसार वडगाव निंबाळकरचे स.पो.नि.सोमनाथ लांडे यानी बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटनेला पत्र दिले होते त्यानुसार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, सचिव अनिल शिंदे, तक्रार निवारण समिती अध्यक्ष, गणेश आळंदीकर, उपाध्यक्ष राजाभाऊ थोपटे, निवृत्त सुभेदार चंदकांत सोनवणे यानी २० सैनिकांची यादी वडगाव निंबाळकरचे स.पो.नि.सोमनाथ लांडे याना दिली. वडगाव निंबाळकर पोलीस अंतर्गत एकुण ६२ गावे असुन पोलीसांची संख्या ४३ असल्याने व निवडणूक एकाच दिवशी राज्यात असल्याने पोलीस बळाची संख्या कमी आहे त्यामुळे आजी माजी सैनिक संघटने ची मदत होइल व निवडणूक शांततेत पार पडेल असे स.पो.नि.लांडे यांनी सांगीतले त्याचप्रमाणे सैनिक संघटनेच्या निवडणुकीत मदत करणाऱ्या प्रत्येक सदस्याला त्याच्या मतदान कक्ष असलेल्या ठिकाणी मतदान करण्याची व्यवस्था केली जाईल व या पथकाद्वारे वडगाव निंबाळकर अंतर्गत सर्व गावात मतदान व्यवस्था शांततेत व कायदेशीर पणे राबविली जाईल असे ही लांडे यानी सांगीतले.फलटण- विधान सभा २०१९ होणाऱ्या निवडणुकीत पोलिसांना बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना,सोमेश्वरचे सदस्य पोलीस दलाला मदत करणार आहेत. पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील यानी राज्यात एकाच वेळी २१ ऑक्टोबरला मतदान होणार असुन अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीसाना निवडणुकीत खुप धावपळ करावी लागणार आहे. त्यामुळे सैन्यदलातील अधिकारी पोलीस व एन एस सी ई ची मदत घेण्याची गरज असुन तशी विनंती संघटनाना करणेत यावी असे पोलिस अधिकारी वर्गाला सुचवले होते. त्यानुसार वडगाव निंबाळकरचे स.पो.नि.सोमनाथ लांडे यानी बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटनेला पत्र दिले होते त्यानुसार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, सचिव अनिल शिंदे, तक्रार निवारण समिती अध्यक्ष, गणेश आळंदीकर, उपाध्यक्ष राजाभाऊ थोपटे, निवृत्त सुभेदार चंदकांत सोनवणे यानी २० सैनिकांची यादी वडगाव निंबाळकरचे स.पो.नि.सोमनाथ लांडे याना दिली.
वडगाव निंबाळकर पोलीस अंतर्गत एकुण ६२ गावे असुन पोलीसांची संख्या ४३ असल्याने व निवडणूक एकाच दिवशी राज्यात असल्याने पोलीस बळाची संख्या कमी आहे त्यामुळे आजी माजी सैनिक संघटने ची मदत होइल व निवडणूक शांततेत पार पडेल असे स.पो.नि.लांडे यांनी सांगीतले त्याचप्रमाणे सैनिक संघटनेच्या निवडणुकीत मदत करणाऱ्या प्रत्येक सदस्याला त्याच्या मतदान कक्ष असलेल्या ठिकाणी मतदान करण्याची व्यवस्था केली जाईल व या पथकाद्वारे वडगाव निंबाळकर अंतर्गत सर्व गावात मतदान व्यवस्था शांततेत व कायदेशीर पणे राबविली जाईल असे ही लांडे यानी सांगीतले.



















