बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अमोल साखरे
दि.१८.०५.१९
आष्टी- घरात कोणीही नसताना एका शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली . आरती आजिनाथ गर्जे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे .तालुक्यातील खिळद येथील आजिनाथ गर्जे हे पनवेल येथे वाहन चालक म्हणून काम करतात. खिळद येथे त्यांची पत्नी,मोठी मुलगी आरती व तिच्या दोन लहान बहिणी राहतात. शुक्रवारी दुपारी आरतीची आई दवाखान्यात गेली होती,तर दोघी लहान बहिणी घराबाहेर खेळत होत्या . या वेळी आरतीने अचानक गळफास घेतला .स्वहत्येचे कारण अद्याप समजले नाही .मृत्यदेह पी एम करण्यासाठी धामणगाव येथे शासकीय प्राथमीक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे .अंभोरा पोलिसांमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अंभोरा पोलीस करत आहेत.



















