पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.०३.२०२१
आंबेगाव- मजूर कामगाराच्या १० वर्षीय पीडित मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एम.अंबाळकर यांनी २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार दंडाची शिक्षा आज ठोठावली आहे. ज्ञानेश्वर उर्फ माऊली शंकर गुंजाळ वय २८ रा. नागापूर, ता. आंबेगाव, जिल्हा पुणे असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे.
आंबेगाव तालुक्यातील एका गावातील मजूर कामगाराच्या १० वर्षीय पीडित मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एम.अंबाळकर यांनी २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ज्ञानेश्वर उर्फ माऊली शंकर गुंजाळ वय २८ रा.नागापूर, ता. आंबेगाव, जिल्हा पुणे असे शिक्षा झालेल्या नराधमाच्या नाव आहे.
या खटल्याची माहिती अशी कि, आंबेगाव तालुक्यातील एका गावात दि.१५ जून २०१६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मजूरकाम करणाऱ्या कामगाराची १० वर्षीय पीडित मुलगी झोपडीत एकटी होती. शेजारी राहणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ माऊली शंकर गुंजाळ वय २८ रा. नागापूर, ता. आंबेगाव, जिल्हा पुणे या नराधमाने घरात कोणी नसतां १० वर्षीय पीडित मुलीस बळजबरीने शेजारील उसाच्या शेतात उचलून नेवून तिच्यावर बलात्कार केला होता. याबाबत पीडित मुलीच्या आईने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपीच्या विरोधात भादंवि कलम ३७६(२)(i) , बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा २०१२ चे कलम ४, ६,८,१०,१२ अन्वये गुन्हा दाखल केला होता त्यानुसार तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस ए तोरडमल यांनी दि.१६ जून २०१६ रोजी ञानेश्वर उर्फ माऊली शंकर गुंजाळ यास अटक केली होती.
हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश ए.एम.अंबाळकर यांचे कोर्टात सुरु होता. सरकारी वकील रजनी नाईक- देशपांडे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने या खटल्यात ७ साक्षीदार तपासले, पीडित मुलगी, तिची आई,पंच, वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकारी एस ए तोरडमल यांची साक्ष नोंदवण्यात आली. पीडित मुलीची साक्ष, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकील रजनी नाईक – देशपांडे यांचा प्रभावी युक्तिवाद ऐकून न्यायाधीश ए.एम.अंबाळकर यांनी आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली शंकर गुंजाळ वय २८ रा. नागापूर, ता. आंबेगाव, जिल्हा पुणे याला दोषी ठरवले. आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली शंकर गुंजाळ वय २८ रा. नागापूर, ता आंबेगाव, जिल्हा पुणे यास भादंवि कलम ३७६(२)(i) , अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावास, बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा २०१२ चे कलम ४ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार दंड, दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठवाली. यात पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून दंडाच्या रकमेतून १० हजार रुपये देण्याचा आदेश दिला. न्यायालयीन पोलीस कामकाज पोलीस हवालदार आर एस जाधव यांनी कामकाज केले.
सरकारी वकील रजनी नाईक- देशपांडे म्हणाल्या, अशा प्रकारची दुष्कृत्ये करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. जेणेकरून लहान मुलीं व महिलांवर होणारे अत्याचार थांबतील. न्यायालयात महिलांवर अन्याय-अत्याचाराचे असंख्य खटले प्रलंबित आहेत. ज्यावेळी हे खटले चालवण्यास येतात त्यावेळी पीडित, पीडितेचे आई-वडील हे सामाजिक बंधन, प्रलोभने याना बळी पडतात. आरोपीं धमक्या देतात यामुळे आरोपीच्या विरोधात ते साक्ष देण्यासाठी पुढे येत नाहीत. काही घटनेत पीडित महिला व साक्षीदार यांना पोलीस संरक्षण मिळणे गरजेचे आहे. अन्यायग्रस्त महिलांनी न घाबरता पुढे येऊन पोलीस ठाण्यात फिर्याद द्यावी न भिता न्यायालयात साक्ष द्यावी. पोलीस, न्यायालय आपल्या बरोबर आहे. सरकारी पक्षाला साथ दिल्यास महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या व दुष्कृत्ये करणाऱ्या नराधम आरोपीला शिक्षा होणे अवघड नाही.



















