पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०२.२०२१
पुणे- डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती स्वातंत्र्यपूर्व काळात मागास विद्यार्थ्यांसाठी सुरू केली होती, ती बंद करण्याचे षडयंत्र इथल्या मनुवादी केंद्र सरकारने ठरविले आहे. सुमारे ६२ लाख मागासवर्गीय विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे लाभार्थी आहेत. त्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. या मुळे मागासवर्गीय विद्यार्थ्याला पुढील शैक्षणिक वाटचाल करण्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागणार आहे म्हणून ह्या कठोर निर्णयाच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी यांना वंचित पुणे जिल्हा व शहर यांनी निवेदन सादर केले आले. मोदी सरकार १ फेब्रुवारीला संसदेत सकाळी ११ वाजता २०२१-२०२२ चे केन्द्रीय बजेट सादर करणार आहे.
त्यामध्ये शिष्यवृत्ती संधर्भात तरतूद करावी ह्या मागणी साठी निवेदन सादर करण्यात आले यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन चे पदाधिकारी शुभम ज्ञानेश्वर चव्हाण
अध्यक्ष पुणे शहर व जिल्हा सम्यक विद्यार्थी आंदोलन संतोष जोगदंड पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष, ओमकार कांबळे युवा नेते वंचित बहुजन आघाडी, राहुल गायकवाड युवा नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



















