चिमूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.११.१९
चिमूर- संत गाडगेबाबा उत्सव समिती चिमूर व जय संतोषी माँ ग्रुप, नवयुवक जयश्रीराम भजन मंडळ वतीने व डाॅ.हेडगेवार रक्तपेढी यांचे संयुक्त विद्यमाने रोशनी सातपूते यांच्या स्मृती प्रित्यर्थ २६ नोव्हेंबर मंगळवारला सकाळी ११ वाजता श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करन्यात आले आहे. रोशनी सातपुते स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी रक्तदान शिबीरांचे आयोजन केले जाते. रक्तदान केल्याने शरीरातील रक्त तयार करणाऱ्या पेशींना लगेच प्रेरणा मिळते व ४८ तासाच्या आत नवीन शुद्ध रक्त भरून येते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते, हृदयविकार, कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होते, आपण दिलेले रक्त दुसऱ्याचे प्राण वाचवू शकतात त्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तींनी रक्तदान करावे, असे आवाहन रोशनी स्मृती प्रित्यर्थ प्रकाश सातपुते, रवी सातपुते अशोक मेश्राम गुणवंता चटपकार मारोती शेंडे, सुनील सवसाकडे, अरविंद गोरशेट्टीवर अमर वांढरे, लखन चटपकार, नयन साठोने, गोपाळराव बावनकार,राजू मेश्राम अंकुश जुमडे, राजू देसाई, सागर पायलीमोडे, कृष्णा दडमल, सारंग भट्ट, रुपेश लांडगे, सतीश ठाकूर, काशीनाथ नैताम, कौस्तुब रेगुलवार, रवी बावनकर, पंकज सातपुते, मिथुन शेंडे, दिनेश कठाने, संदीप शेळकी, मिलिंद सातपुते, रामू चटपकार, प्रवीण शिवरकर, शुभम सातपुते, गौरव सातपुते, ऋषभ सातपुते यांनी केले आहे.



















