चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.५/२/१९
चिमूर, जि. प.ऊ.प्रा. शाळा. पळसगांव येथे रोजी चिमूर तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा या केवळ नावापुरत्याच राहिल्या असा अनेकांचा गैरसमज दूर करणाऱ्याही काही शाळा आहेत. चिमूर तालुक्यातील पळसगवं येथील जिल्हा परिषद शाळा आहे. जे चांगल्या भागातील शाळेत नाही ते सर्व या शाळेत पाहायला मिळते. चिमूर वरून २२ किमी अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची यशोगाथा तालुक्यात कौतुकास्पद ठरत आहे. एवढ्या दुर्गम भागात ही शाळा असून आज या शाळेची स्मार्ट शाळेसाठी वाटचाल चालू आहे. यासाठी येथील उपक्रमशील शिक्षिका, मंजुषा मेंडुलकर मॅडम यांच्या कल्पकतेतून खरी कमाई बाल आनंद मेळावा आयोजित केला या कामी शाळातील सर्व शिक्षकांचीही मेहनत तेवढीच महत्त्वाची आहे हे या शाळेतील शिक्षकांनी दाखवून दिले आहे. कृतीशील शिक्षक असला की त्यांना सांगण्याची गरज नाही अशी कौतुकास्पद शाळा तयार होते हे यावरुन दिसते. जि.प. शाळा पळसगाव भेट दिली तर या शाळेत अनेक गोष्टी या नाविण्यपूर्ण दिसतील. सोईसुविधा उपक्रम या बाबतीत ही शाळा अजिबात मागे नाही वनविभागच्यावतीने चार फुटाच्या आरओ युव्हीयुक्त थंड पाण्याचे वाटर फिल्टरपासून तर विद्यार्थ्यांसाठी विज्ञान साहित्य प्रयोग शाळा विद्यार्थ्यांसाठी आपण वैज्ञानिक युगात वावरत आहोत, याचा परिचय देते. सुलभ वाचनालय अशा अनेक सोयीसुविधा आपणास दिसतील ग्रामीण भागातील शाळेत आजच्या घडीला २०५ विद्यार्थी शिकत आहेत. तेथील शिक्षकांची एवढी मेहनत आहे की, त्या शाळेला त्यांनी विविधतेनी नटवले आहे. यासाठी गावकऱ्यांचा सहभाग मिळाला असेही शिक्षक सांगतात. तालुका दुर्गम भागात असून या येथील विद्यार्थी स्पर्धेत टिकत नाही किंवा येथील शिक्षक शाळा बरोबर करीत नाही, विद्यार्थी किंवा शाळेकडे लक्ष देत नाही पण पळसगाव येथील शाळा मात्र अपवाद आहे. या शाळेत असणाऱ्या सुविधा संगणक कक्ष, विद्यार्थी बचत बँक, स्वतंत्र मूत्रिघर, शौचालय, मध्यान भोजनासाठी सुसज्ज बैठक प्लॉरिंग, किचन शेड, ध्वनी प्रक्षेपक संच प्रत्येक वर्गात डिजिटल टीव्ही संच, दिव्यांगासाठी रॅम्पची व्यवस्था, बैठक व्यवस्थेचे डेक्स बेंच, खेळ साहित्य, शैक्षणिक साहित्य. शाळेत राबविण्यात येणारे उपक्रम सप्तरंगी परिपाठ, अभ्यास गट, शालेय मंत्रिमंडळ, मिना-राजू मंच, दप्तर विरहीत शाळा (एकदिवस), थोर व्यक्तींच्या जयंत्या-पुण्यतिथ्या, माझी शाळा माझे दुकान, माझी रोजनिशी, माझी स्वच्छ शाळा, वृक्षारोपण संवर्धन, विद्यार्थी ड्रेस कोड, तंबाखु मुक्त शाळा, स्वलेखन करणे, पालक सभा, माता पालक संघ, बाल आनंद मेळावा, शैक्षणिक सहल, खरी कमाई, औषधी वनस्पती लागवड,असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. खरी कमाई मधून विद्यार्थांना व्यवहारज्ञान मिळावे यासाIठी खरी कमाई अंतर्गत विदयार्थ्यांतर्फे आठवडी बाजाराप्रमाणे सर्व प्रकारचे स्टॉल लावण्यात आले. सर्व ग्रामस्थांनी आमच्या शाळेतील विद्यार्थांना आठवडी बाजाराची अनुभूती देण्यासाठी व चिमुकल्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी उपस्थिती नोंदविली. या मेळाव्याचे उदघाटन सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील ठाकरे, सरपंच गीता शेंडे, भक्तदास कोहचाडे, वाघ मॅडम ग्रामसेवक वार्ताहर विकास दादा, आदि मान्यवर उपस्थित होते, शाळेच्या मुख्याध्यपक श्री.फुलझले सर, कामडी सर विषय शिक्षक, धरणे सर, केंद्र सर, ठवरे मॅडम, पेंदोर मॅडम यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपस्थित सर्वानी स्वतः बाजारातून खाऊ व भाजीपाला खरेदी केला व विद्यार्थ्यांना अनुभूती दिली, सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.



















