पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२०/३/१९
पिंपरी, एटीएम मशीन मधून पैसे निघत नसल्याचा फायदा घेत एटीएम कार्ड अदला बदली करून त्या व्दारे एका महिलेच्या खात्यातुन परस्पर पैसे काढल्याचा प्रकार चिंचवड परिसरात घडला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या संदर्भात फिर्यादी महिलेने बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप (महा.राज्य) संघटनेशी संपर्क साधुन मदत मागताच ग्रुपचे संस्थापक,अध्यक्ष मा. किरण शिंदे, सुमित गायकवाड, विकास ओव्हाळ आदी पदाधिकाऱ्यांसह वरीष्ट पोलिस निरीक्षक मा.सतीश माने यांच्याशी भेटून या प्रकरणी गुन्हा राजिस्टर करण्याची विनंती केली.
सदर घटनेची सविस्तर माहिती अशी की रेखा विजय पाखरे वय ४१ रा.आदर्शनगर,हिजंवडी या डांगे चौक येथील SBI बँक एटीएम व्दारे काढत होते पण पैसे निघत नसल्याने तेथील अनअोळखी इसम पैसे काढून देतो सांगत पाखरे यांचे कार्ड घेऊन पैसे काढत असल्याचे भासवत कार्ड बदली करून त्यांच्या जवळील कार्ड देवून निघून गेला. व चिंचवड येथील एटीएम मशीन मधून कार्ड व्दारे ७५०० (सात हजार पाचशे रूपये) काढून फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा रजि. झाला असून सहायक पो.नि. भोगम तपास करत आहेत



















