चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२०.१२.१९
नागभीड- तालुक्यातील जनता कन्या विद्यालय नागभीड येथे तालुकास्तरिय मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला एन .के. भानारकर शि.वि.अ.,डॉ.भाग्यश्री आखाडे वैद्यकीय अधिकारी नागभीड, सौ.कोतकोंडावार केंद्र प्रमुख,सौ.चव्हाण मुख्याध्यापिका जनता कन्या विद्यालय यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेत मासिक पाळी म्हणजे काय त्यावरील आव्हाने व उपाय तसेच मासिक पाळी संदर्भात गैरसमज अंधश्रद्धा व मासिक पाळी व्यवस्थापन विविध पद्धती याविषयी ७ सत्रात कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला सुलभक म्हणून सौ.स्मिता खापर्डे विषय साधन व्यक्ती छाया विंचुरकर, प्रेमा अंबादे, कु.निर्मला सोनवणे, सौ.मंगला वाघमारे, सौ.माया मेश्राम, श्रीमती मंगला धनविजे, सौ.तलमले यांनी कार्य केले .कार्यशाळेचे संचालन व आभार प्रदर्शन कु.निर्मला सोनवणे यांनी केले.



















