पिंपरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१६.०८.२०२२
पिंपरी- रिपब्लिकन सेना पक्षाच्या युवक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते धुराची शिंदे यांची निवड करण्यात आली. हि निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशावरून व महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष किरण घोंगडे साहेब यांच्या शिफारशीनुसार प्रदेश उपाध्यक्ष महेश शिवशरण यांच्या हस्ते पिंपरीतील कार्यालयात करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रात आगामी काळात मोठ्या प्रमाणावर फिरून पक्ष बांधणी करण्याचे वचन शिंदे यांनी दिले त्यांची संघटन शक्ती पाहता व त्यांचे आंबेडकर घराण्याची निष्ठा व काम पाहून त्यांच्यावर हि जबाबदारी सोपविण्यात आली असे शिवशरण यांनी सांगितले. यावेळेस पुणे जिल्हा युवक अध्यक्ष संदिप साळुंखे,भाऊसाहेब दनाने,संजय भंडलकर, सामाजिक कार्यकर्ते भास्कर तिकटे, कांचन जावळे,गिरीश सोनवणे, एकनाथ कसबे, आदी उपस्थित होते.



















