रायगड(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, अमित साहू
दि.२९.०८.२०२३
फुंडे- रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने एक्सटेंशन एक्टिविटी (विस्तारित उपक्रम) अंतर्गत ब्रह्मानंद प्रतिष्ठान संचलित आणि अपंग कल्याण विभाग पुणे संलग्नित उरण सीबर्ड स्पेशल स्कूल येथे मंगळवार दि. २९ ऑग. रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात हिंदी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना राखी बांधून त्यांना शालोपयोगी भेटवस्तू व अल्पोहार वाटप करण्यात आले.
खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून हिंदी विभागामार्फत हा स्तुत्य उपक्रम राबविला गेला. दिव्यांग असलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्यातील कला – गुण विद्यार्थ्यांसमोर सादर करून एक आदर्श ठेवला. बौद्धिक क्षमता कमी असलेल्या या मुलांना स्वयंपूर्ण बनवून समाजात आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी त्यांचे शिक्षक पल्लवी मॅडम, राकेश सर हे विशेष मेहनत घेतात.
महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात एकूण ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. अतिशय आनंदमयी व उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम सम्पन्न झाला. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. पी.जी. पवार साहेब तसेच हिंदी विभाग प्रमुख डॉ. झेलम झेंडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन या उपक्रमासाठी लाभले. या प्रसंगी हिंदी विभागाच्या सहायक प्राध्यापिका डॉ. सुजाता पाटील उपस्थित होत्या.



















