निर्भीड पत्रकार वृत्तपत्राची बैठक आनंदात यशस्वीरित्या संपन्न…
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, स्वप्निल इंगळे दि.२८.०६.२०२६
पिंपरी – निर्भीड पत्रकार वृत्तपत्र पिंपरी चिंचवड विभागाची महत्त्वपूर्ण बैठक आज (दि.२८ जून) रोजी पिंपरी चिंचवड येथे मुख्य संपादक नंदकुमार जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीस प्रतिनिधी मयूर चव्हाण, स्वप्नील इंगळे, विकास ओव्हाळ, आनंद मोरे आणि उद्धव कुंभार उपस्थित होते. बैठकीदरम्यान वृत्तपत्राच्या पुढील वाटचाली संदर्भात विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पत्रकार संघटन अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक निर्णयांवर विचार विनिमय झाला. यावेळी संस्थेत नवीन सदस्य म्हणून मनोज पोहरकर व ऋषिकेश केदारे यांचे नियुक्तीपत्र देऊन स्वागत करण्यात आले. मुख्य संपादक नंदकुमार जोगदंड यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना पत्रकारितेतील जबाबदाऱ्या, निःपक्षपाती वृत्तांकन, वृत्तपत्रात काम करताना शिस्त आणि समाजाप्रती असलेले कर्तव्य याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.निर्भीड पत्रकार या संस्था अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.



















