थायलंडमध्ये भीषण दुर्घटना; निष्पाप भिक्षूंवर काळाचा घाला!
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, उद्धव कुंभार
दि.०४.०७.२०२६
मुंबई – थायलंडमध्ये घडलेल्या एका हृदयद्रावक रस्ता अपघाताने संपूर्ण जग हादरले आहे. धार्मिक यात्रेसाठी निघालेल्या बौद्ध भिक्षूंवर भरधाव पिकअप वाहनाने धडक दिल्याने ९ भिक्षूंचा जागीच मृत्यू, तर १४ जण गंभीर जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार हे वाहन ११ वर्षीय मुलगा चालवत होता, ही बाब अधिक धक्कादायक आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे बौद्ध समाजासह संपूर्ण मानवतेवर शोककळा पसरली आहे.



















