कासारवाडीजवळ एसटी बस आणि कारची भीषण धडक; कारमधील प्रवासी गंभीर जखमी
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, देवाम्मा ददली
दि.०५.०७.२०२६
पिंपरी – कासारवाडीजवळील कुंदननगर परिसरात
रविवारी सकाळी एसटी बस आणि चारचाकी कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, एसटी बस आणि कार यांची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तसेच जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून जखमीची ओळख आणि अपघाताबाबतचा सविस्तर तपशील अद्याप समोर आलेला नाही.



















