अपघाताचा बनाव उघड; अकोला स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या ३ तासांत हत्येचा छडा
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, योगीराज सरदार
दि.१०.०७.२०२६
अकोला- डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता हत्येचे वळण मिळाले आहे. पैशांच्या वादातून मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर त्याला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला.मात्र, अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत चातुर्याने तपास करत अवघ्या ३ तासांत या ‘ब्लाइंड मर्डर’चा छडा लावला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास डाबकी रोड पोलीस करत आहेत. या कामगिरीमुळे पोलीस दलाचे कौतुक होत आहे.



















