पिंपरीगाव येथे SIR फॉर्म वाटप सुरु
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, स्वप्निल इंगळे
दि. १२.०७.२०२६
पिंपरी – भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत पिंपरीगाव येथील नवमहाराष्ट्र शाळा परिसरात मतदार पडताळणीसाठी SIR फॉर्मचे वाटप करण्यात आले. नवमहाराष्ट्र विद्यालय हे पिंपरीगावातील जुने शैक्षणिक केंद्र असून या परिसरात मतदार पडताळणीचे काम सुरू आहे.
या मोहिमेत सुपरवायझर गणेश अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली BLO अभिमन्यू मोटे सर यांनी मतदार यादी भाग क्रमांक 308 मधील नागरिकांना SIR फॉर्मचे वितरण करून मतदार यादीतील माहिती पडताळण्याचे आवाहन केले.
नागरिकांनी फॉर्म अचूक भरून आवश्यक माहिती वेळेत सादर करावी, तसेच मतदार यादीतील नाव, पत्ता व इतर तपशील पडताळून घ्यावेत, असे आवाहन संबंधित अधिकाऱ्यांनी केले. SIR अभियानामुळे मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यास मदत होणार आहे.



















