औरंगाबाद मनपा सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी…
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, आनंद मोरे
दि.३१.०७.२०२६
छ.संभाजी नगर – औरंगाबाद महानगरपालिकेच्या सभापती पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या करुणा मेघानंद जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत करुणा जाधव यांना एकूण ७ मते मिळाली असून त्यांनी सभापतीपदावर विजयाची मोहोर उमटवली.
निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडी, AIMIM आणि शिवसेना या तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी चार-चार मते असल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र मतदानावेळी करुणा जाधव यांच्या बाजूने अतिरिक्त पाठिंबा मिळाल्याने त्यांना ७मते प्राप्त झाली आणि त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करत सभापतीपद पटकावले.
या विजयामुळे औरंगाबादच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विजयाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष करत करुणा जाधव यांचे अभिनंदन केले.



















