स्कूल बस सुरक्षेसाठी नियमांची कडक अंमलबजावणी; कॅमेरे, फर्स्ट एड बॉक्ससह विविध सुविधांवर भर
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.१४.०८.२०२६
मुंबई- शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल बस व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. फादर एंजल स्कूल, वाशी सेक्टर ६अ येथे स्कूल कमिटीच्या बैठकीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
RTO कडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पोलिस आयुक्तालय कार्यालयाकडून देण्यात आलेल्या नियमांनुसार आवश्यक त्या उपाययोजनांची पूर्ण अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
स्कूल बसमध्ये CCTV कॅमेरा, First Aid Box तसेच तक्रार पेटी यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच स्कूल बस चालक व हेल्पर यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत भविष्यातही आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने राबविण्यात येतील, अशी माहिती स्कूल कमिटीच्या बैठकीत देण्यात आली.



















