डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीचे औचित्य साधून ग्रंथपाल दिन मोठ्या उत्साहात संपन्न.
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.१४.०८.२०२६
अकोला – अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालय नया अंदुरा जी. अकोला येथे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती दिन तथा ग्रंथपाल दिन श्री. राजेंद्र रामचंद्र तायडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी श्री.अंबादासजी साबळे, सेवानिवृत्त अभियंता व सत्कारमूर्ती ग्रंथ मित्र रामेश्वर पोहेकर सेवानिवृत्त ग्रंथपाल तेल्हारा हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रथमतः मान्यवरांनी डॉ. एस . आर. रंगनाथन या महामानवाला अभिवादन केले. त्यानंतर गेल्या ३५ वर्षापासून ग्रंथालय चळवळीत जिद्द आणि चिकाटीने, निस्वार्थपणे समाजसेवा करणारे सेवानिवृत्त तथा आदर्श ग्रंथपाल ग्रंथ मित्र रामेश्वर पोहेकर यांचा वाचनालयाच्या वतीने श्री.अंबादासजी साबळे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दशरथ गवई, विष्णू गिरे, एकनाथ पाटील, शिवाजी ठाकरे, आशिष उमाळे, दादाराव इंगळे, अनिल तायडे, ओम ठाकरे व वाचनालयाचे पदाधिकारी , कर्मचारी, वाचक, सभासद तथा सर्व स्पर्धा परीक्षा विभागातील विद्यार्थी ग्रंथ प्रेमी यांची आवर्जून उपस्थिती होती. सर्वांचे आभार वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र तायडे यांनी मानले.



















